घरात घुसून मारहाण करत महिलेला जीवे मारण्याची धमकी
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील साकळी येथील सरला गजानन सोनवणे या महिलेला जबरदस्तीने तिच्या घरात घुसून वासुदेव वडर याने मारहाण व शिवीगाळ केली.
यावल येथून जवळच असलेल्या साकळी येथे सरला सोनवणे यांनी वासुदेव केशव वडर यांच्याकडून पैसे घेतले होते. पैसे मागण्या साठी वासुदेव वडर याने घरात जबरदस्तीने प्रवेश करून त्यांना शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या बाबत सरला सोनवणे यांनी पोलीस स्टेशन ला फिर्यादी दिल्याने वासुदेव केशव वडर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.