यावल तालुक्यातील न्हावी गाव परिसरातील गुटख्याचे मध्यवर्ती केंद्र, सौजन्य कोणाचे?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल – रावेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर माध्यप्रदेशातून विमल गुटख्या सह महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास प्रतिबंध असलेला व मानवी जीवनास अपायकारक असलेला तंबाखू जन्य सुगंधित केसरयुक्त पान मसाल्याची तस्करी होत आहे, अनेक वेळा लाखो-करोडो रुपयांचा आतापर्यंत गुटखा पकडला गेला.
गेल्या २८ मे म्हणजेच महिना भरापूर्वी यावल तालुक्यातील फैजपूर येथून जवळच असलेल्या न्हावी गावातील किराणा दुकानात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पथकाने छापेमारी करत सुनील किराणा दुकानातून ७ लाख ३१ हजार ३२० रुपयांचा महाराष्ट्रात विक्री व बाळगण्यास प्रतिबंध असलेला व मानवी जीवनास अपायकारक असलेला तंबाखू जन्य सुगंधित केसरयुक्त विमल पान मसाला (गुटखा) मोठा साठा जप्त केला होता परंतु लागलीच न्हावी गावातून यासह तिघा गुटखा तस्करांकडून विमल गुटख्यासह अन्य तंबाखूजन्य पदार्थांची अवैध तस्करी जोमात सुरू आहे. या कडे संबंधितांचे दु…र्ल.. क्ष.. केले जात आहे?
न्हावी सारख्या छोट्याश्या गावात तीन मोठे गुटखा किंग न्हावी गावातील हे किराणा दुकान परिसरातील गुटखा विक्रीचे मध्यवर्ती केंद्र असून या सोबत न्हावी गावात आणखी दोन मोठे गुटखा किंग आहेत, जुनी सिनेमा टॉकीज परिसर,मठ वाडा, व फिरके वाडा असे तीन ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत असून परिसरातील सर्व आजूबाजूच्या खेड्यांवर विमल गुटखा पोहचवला जात असतो , तसेच जवळच असलेल्या काळमोदा गावी गुटख्याचे मोठे गोडाऊन आहे, इतकेच नव्हे तर फैजपूर व परिसरासह सावदा परिसरात सुद्धा विमल गुटखा मोठ्या प्रमाणावर पोहोच केला जातो. दररोज लाखो रुपयांची येथे उलाढाल होत असून पोलीस अधीक्षक याच्या पथकाला या बाबत माहिती मिळते आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाला कारवाई करावी लागते मग स्थानिक पोलीस का कारवाई करीत नाही? स्थानिकांना माहिती नाही का, की इथे गुटखा पुन्हा पूर्ववत जोमात सुरू झाला आहे? ही अवैध गुटखा तस्करी सौजन्याने तर नव्हे ?….