क्राईमयावल

चाकू हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी,हल्लेखोर फरार

यावल,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील किनगाव येथे एका तरुणाने तीन तरुणांवर प्राणघातक चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले, ही घटना रात्री घडली असून हल्लेखोर फरार आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथे काल रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास शाह नामक तरूणाने तौसीफ समीर तडवी, वय१९ वर्ष , शरीफ लुकमान तडवी, वय १९ वर्ष आणी सद्दाम नवाज तडवी,वय २० वर्ष या तीन युवकांवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात हे तिन्ही तरूण गंभीर जखमी झाले असून तिघांना यावल ग्रामीण रुग्णातयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या बाबत रात्री उशिरा यावल पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोर फरार आहे, चाकू हल्ला का करण्यात आला याबाबत पोलिस पोलीस तपास करत आहेत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!