भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

केवळ दहा वर्षे वय व इयत्ता तिसरीच्या वर्गात असलेल्या बालकाने ओढल्या बारा गाड्या

यावल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील येथील श्री मरीमाता यात्रा व श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडल, गेल्या ४० वर्षाच्या काळात एक नवीन इतिहास म्हणजे केवळ दहा वर्षे वय असलेल्या व इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या भगत रणवीर राजू कोळी या बालकाने श्री मरी माता मंदिरा जवळील बारा गाड्या ओढल्या.

भालोद ता.यावल, येथील कोळी कुटुंबीयांना सुतुक असल्याने कोळी पंचमंडळीने हा निर्णय घेतला संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एवढ्या बाल वयातील बालकाने मारीमातेच्या बारा गाड्या ओढल्याने परिसरातील नागरिकांनी व गावातील नागरिकांनी या ठिकाणी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती तसेच खंडेराव महाराज मंदिराजवळील बारा गाड्या सचिन निळकंठ कोळी या युवकाने ओढल्या या प्रसंगी सरपंच प्रदीप श्रीराम कोळी, मधुकर दोधू कोळी, रामा भागवत कोळी ,सुधाकर सदू कोळी, रामकृष्ण सदू कोळी ,पंढरी भागवत कोळी, माधव राजाराम कोळी, निलेश पंढरी कोळी, पितांबर कुंभार, शंकर बूधो भोई, मोहन झांबरे, योगेश नेमाडे ,ललित झांबरे, हूना चोपडे, पिंटू चौधरी, धनराज झोपे,जितेंद्र रघुनाथ कोळी सुनील मधुकर कोळी दीपक श्रीराम कोळी चेतन माधव कोळी अदि सह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने यात्रेला उपस्थित होते .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!