थोरगव्हाण येथे दोन गटात मारहाण : पाच जणांना अटक
Monday To Monday NewsNetwork |
यावल, प्रतिनिधी : तालुक्यातील थोरगव्हाण येथे शनिवारी रात्री रस्त्यात मोटर सायकल आडवी लावण्याच्या कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक व नंतर झालेल्या वादात चार जणं जख्मी झाले असुन याबाबत पोलीसात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन, दोन्ही गटातील ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार पहील्या तक्रारीत म्हटले आहे की मी दिनांक १० जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास थोरगव्हाण शिवजवळ रामेश्वर किशोर पाटील यास समाधान मंगल सोनवणे , निलेश समाधान सोनवणे, योगेश लहु सोनवणे व सुनिल रामकृष्ण सोनवणे सर्व राहणार थोरगव्हाण यांनी म्हटले की तुम्ही रस्त्यात का मोटरसायकल उभी केली आहे आमचे वाळुचे ट्रॅक्टर येत आहे असे बोलुन शिवीगाळ करून यातील समाधान सोनवणे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने दिनेश अशोक पाटील यांच्या डोक्यावर आणी छातीवर मारहाण करून दुखापत केली तसेच त्यांच्या सोबत असलेले योगेश सोनवणे व सुनिल सोनवणे यांनी माझ्या सोबत असलेले प्रविण भागवत पाटील यांना लाकडी काठीने हातावर आणी पाठीवर मारहाण करून दुखापत केली व वाळुने भरलेले ट्रॅक्टर त्याच ठीकाणी खाली करून त्या ठीकाणाहुन निघुन गेलेत या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
तर परस्पर दुसऱ्या गटाकडून समाधान मंगल सोनवणे यांनी म्हटले आहे की दिनांक १० जुलै रोजी रात्री ७ , ४५ वाजेच्या सुमारास मी थोरगव्हाण गावावळ मोटरसायक क्रमांक १९ डीडी ७१८२ ने शेतातुन घरी येत असतांना ज्ञानेश्वर पाटील , रामेश्वर पाटील, गणेश पाटील , प्रविण पाटील सर्व राहणार थोरगव्हाण यांनी सर्वांनी मिळुन माझी मोटरसायकल अडवुन माझ्या शाब्दीक वाद घालुन शिवगाळ करून यातील प्रविण पाटील व रामेश्वर पाटील याने लाथाबुक्याने व त्याच्या हातातील लाकडी काठीने पाठीवर पायावर मारहाण करून मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली समाधान सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे , या दोघ मारहाणीच्या घटनेतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोहॅकॉ गोरख पाटील हे करीत आहे .