यावल

बामणोद येथे विहिरीत पडल्याने दोन मजुरांचा मृत्यू !

बामणोद, मंडे टू मंडे वृत्तसेवा : यावल तालुक्यातील बामणोद येथे विहिरीचे खोदकाम करतांना दोन मजूरांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल दोन्ही रा. मोयखेडा दिगर ता. जामनेर असे मयत झालेल्या मजूरांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी,  यावल तालुक्यातील बामणोद गावातील झांबरे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम करण्यात येत असून गुरूवार १० मार्च रोजी रात्री १० वाजता खोदकाम करत असतांना अचानक दोर बांधलेला लोखंडी खुंटा उपटल्याने काम करणाऱ्या जामनेर तालुक्यातील मोयखेडा येथील बापूर काशीराम कानळजे आणि भाऊलाल रामदास भिल या दोन्ही मजूरांना तोल जावून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैजपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री अंधारात मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे व शोध घेणे शक्य न झाल्याने सकाळी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!