भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या दोघा तरुणांचा तापी नदीत बुडून मृत्यू

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील शिरागड (लहान गड) येथे देवीच्या दर्शनासाठी जळगाव येथील दोन तरुण सप्तश्रृंगी देवी मंदिराजवळील तापी नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली.

रोहन काशिनाथ श्रीखंडे ,वय १७, रा. रामानंद नगर, जळगाव. व प्रथमेश शरद सोनवणे. वय १७, रा. वाघ नगर, जळगाव. असे मयत तरुणांचे नाव असून त्यांनी नवीन दुचाकी घेतली होती. हि दुचाकी घेऊन ते यावल तालुक्यातील शिरागड येथे दि. १५ एप्रिल सोमवार रोजी गेले होते. दर्शन आटोपल्यावर त्यांनी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराजवळ तापी नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेले मात्र नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली.

या बाबत आजूबाजूच्या ग्रामस्थांनी यावल पोलीस स्टेशनला माहीती दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी यावल ग्रामीण रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी रवाना केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही मुलांना मृत घोषित केले. या बाबत यावल पोलीसस्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, भरत कोळी करीत आहेत. दरम्यान, मृतांचे नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!