भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ अंतर्गत १६ ऑक्टोबर ला फैजपूर येथे हिंदू संघटन मेळावा !

फैजपुर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने मागील २० वर्षे अविरतपणे कार्यरत असलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात् घटस्थापनेच्या दिनी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या द्विदशक-पूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात समितीच्या वतीने व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण भारतभर ३१ ऑगस्टपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून चालू झालेले हे अभियान नोव्हेंबर महिन्यापर्यंत राबवले जाईल, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर, यांनी फैजपूर येथील शुभ दिव्य मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी समितीचे यावल येथील सेवा पाहणारे धीरज भोळे हे ही उपस्थित होते.

श्री. जुवेकर पुढे म्हणाले की, स्थापनेपासून समितीने अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, पत्रकार-संपादक असे विविध क्षेत्रातील हिंदूंना संघटित करण्याचे कार्य केले आहे. आज जवळजवळ देशभरातील ५०० हुन अधिक हिंदुत्ववादी संघटनाना एका ठिकाणी आणण्याचे, त्यांना हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी दिशा देण्याचे व्यापक कार्य समिती करत आहे. यासाठी समितीने आतापर्यन्त जी १० राष्ट्रीय हिंदू अधिवेशन घेतली आहेत. समिती जे विविध उपक्रम राबवते त्याचा पाय अध्यात्मिक अधिष्ठान आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देऊन धर्माचरण करण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य समितीच्या माध्यमातून केले जाते. यामुळे अनेक युवक आज धर्माचरण करून आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

हिंदु राष्ट्र संकल्प अभियानातील विविध उपक्रम !
‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’त ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’, ‘हिंदु धर्माची महानता’, ‘शौर्य जागरणाची आवश्यकता’, ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’ इत्यादी विषयांवरील व्याख्याने, हिंदु राष्ट्र जागृती करणारी फलकप्रसिद्धी करणे, मंदिरे, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम, स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या अंतर्गतच येत्या रविवारी, १६ ऑक्टोबर या दिवशी शहरातील शुभ दिव्य मंगल कार्यालय येथे सायंकाळी ५ वाजता हिंदु संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंदु राष्ट्र परिसंवाद’, हिंदुत्वनिष्ठ संघटना, अधिवक्ता यांच्या बैठकाही आदी उपक्रम देशभरात राबवले जाणार आहेत, अशी माहिती श्री. धीरज भोळे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, ‘या उपक्रमांतून हिंदु समाजमनात हिंदु राष्ट्राचा संकल्प दृढ व्हावा आणि हिंदु समाजाने हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील व्हावे, या दृष्टीने उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. हे अभियान चालू झाल्यापासून विविध संघटना, संप्रदाय यांना सोबत घेऊन आयोजित केलेल्या समितीच्या विविध उपक्रमांना समाजातून आतापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १३१ ठिकाणी हिंदुराष्ट्र संकल्प प्रतिज्ञा घेण्यात आली, ४ ठिकाणी मंदिर स्वच्छता करण्यात आली, ७ ठिकाणी विविध विषयांवर व्याख्याने घेण्यात आली, तसेच ५ तालुक्यात हिंदू संघटनांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जळगाव शहर आणि चोपडा तालुका येथे हिंदू संघटन मेळावे यशस्वीरीत्या पार पडले आहेत.’

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!