भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमयावल

डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे यावल तालुक्यातील महिलेचा दुदैवी मृत्यु

यावल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यांतच नव्हे तर जिल्हाभरात अनेक ठिकाणी बोगस डाक्टरांनी आपली दुकाने सुरू केली आहेत. पैसे कामावण्यापोटी रुग्णांच्या जीवाशी हे डॉक्टर खेळ खेळत आहेत. तक्रारी करूनही संबंधित खात्याकडून या बोगस डॉक्टरांवर कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. असे असताना यावल तालुक्यातील कोरपावली येथील आदिवासी महिलेला बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोरपावली गावात गेल्या तीन ते चार वर्षांपासून विद्युत राय नामक एका बंगाली कथित बोगस डॉक्टरने आपला दवाखाना सुरू केला होता, या डॉक्टराच्या विरुद्ध यावल तालुका डॉक्टर असोसिएशन पासुन तर गावातील सरपंच यांनी वारंवार संबंधितांन कडे तसेच तालुका आरोग्य विभागाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु, आरोग्य विभागाने थातुरमातुर चौकशीच्या पलीकडे कुठलीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे या बोगस डॉक्टराचा दवाखाना द्वारे आपली दुकाने राजरोसपणे सुरूच आहेत.

दरम्यान, बोगस डॉक्टराकडे सदरच्या ४० वर्षीय आदिवासी महिलेचा उपचार सुरु होता. उपचार सुरू असतांना बोगस डॉक्टराकड्रन चुकीच्या पद्धतीने महिलेस इंजेक्शन दिले गेल्याने तिचा पायावर विपरीत परिणाम होऊन तिला त्याचा खूप त्रास होऊ लागला. हा प्रकार या तोतया डॉक्टरच्या लक्षात आल्याने उपचार सुरू असतानाच संबंधीत बोगस डॉक्टराने काही दिवसापुर्वीच गावातून गाशा गुंडाळून पळून गेल्याची माहिती मिळत आहे. आणि त्यातच दुर्दैवाने या आदिवासी महिलेचा मृत्यू झाला

तालुक्यासह जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टर्स रूग्णांच्या जीवाशी खेळत असतांना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही ? लेखी तक्रारी करून सुद्धा टाळाटाळ करून पाठीशी का घातलं जात? या महिलेच्या मृत्यूस जबाबदार कोण? याची चौकशी केली जाईल का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून आरोग्य यंत्रणा यावर काय कारवाई करते या कडे परिसरातील जनतेचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!