यावल तालुक्यात गावठी बॉम्बचा स्फोट, महिला जखमी
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक या गावी शेतात काम करणाऱ्या महिलेला शेतात काम करत असताना काहीतरी चेंडू सारखा बाम्ब सदृश्य गोळा दिसला , हे आहे तरी काय हे त्या गोळ्याची छेडछाड करून पाहणी करत असताना अचानक तो फुटल्याने महिला गंभीर जखमी झाली,तपासा अंती तो
गावठी बनावटीचा हात बॉम्ब असल्याचे लक्षात आले,यामध्ये तिच्या हाताला जबर दुखापत झाली.
फासेपारधींनी रानडुकरांच्या शिकारीच्या उद्देशाने हातबॉम्ब शेतात पुरले असतील असा संशय व्यक्त केला जात आहे. यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक या शिवारात तापी नदीच्या किनारी नरेश लक्ष्मण जावळे यांच्या शेतात त्यांनी हरभरा पेरणी केला आहे. या हरभऱ्याच्या शेतात महिला मजूर काम करत होत्या. यावेळी बेबाबाई पंडित सोनवणे या महिलेला एक गोळा आढळून आला. सदर गोळा हा गावठी बनावटीचा हात बॉम्ब होता. मात्र, महिलेने त्याला खुरपी द्वारे ते बघत असताना छेडछाड केली व अचानक त्याचा मोठा विस्फोट झाला.यात बेबाबाई सोनवणे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून हातला जबर दुखापत झाली. या विस्फोटानंतर शेतकरी नरेश जावळे यांनी जखमी अवस्थेतील महिलेला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करून प्राथमिक उपचारा नंतर जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या बाबत अधिक चौकशी केली असता , शेतासह परिसरात फासेपारधींकडून रानडुकराच्या शिकारीसाठी अशा पद्धतीने गावठी बनावटीचे हात बॉम्ब बनवून जमीनीत पुरले जातात तेव्हा शेत मशागतीत हा बॉम्ब जमीनीत गाडला जातो, महिले कडून त्याची छेळछाड करत असताना अचानक त्याचा ब्लास्ट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.घटनास्थळी पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर, उपनिरिक्षक प्रदिप बोरूडे पथकासह दाखल झाले व पाहणी केली