भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

कोरोना नियमाचे उल्लंघन; यावल शहरात ४ दुकाने सील व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरु.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल (सुरेश पाटील)। जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार कोरोना नियमाचे उल्लंघन करून दुकानावर गर्दी करणे तोंडाला मुख्य पट्टी (मास्क) न लावल्याचे कारणावरून यावल शहरात चार दुकाने सील करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आज दि.10 रोजी दुपारी केली.

यावल नगरपालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की कोविड–19 संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार यावल तहसीलदार महेश पवार, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने यावल शहरातील गर्दीच्या ठिकाणी आज दुपारी अचानक भेटी देऊन गर्दी असलेली चार दुकाने सील करण्यात आली व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली. यावल शहरातील बुरूज चौकातील पटेल टी सेंटर, नगीना कम्युनिकेशन,पापुलर झेरॉक्स, हिंगलाज स्वीट मार्ट,अशी4दुकाने सील करण्यात आलेली आहे तसेच मेन रोडवरील अशोका रेडिमेट स्टोअर्स यांचेवर गर्दी बाळगणे व तोंडावर मुख्य पट्टी (मास्क) न वापरणे या कारणावरून गुन्हे दाखल करणेकामी प्रक्रिया करण्यात आली.

सदरची कार्यवाही तहसीलदार महेश पवार,नायब तहसीलदार आर.के.पवार,पोलीस निरीक्षक सुधीर पाटील,मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यासह पोलीस कर्मचारी व नगरपरिषदेचे कर्मचारी विजय बडे, शिवानंद कानडे,शरद पाटील,सुनील उंबरकर यांनी सदरची कार्यवाही केली.यामुळे संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!