यावल मुख्याधिकारी व नागराध्यक्षांचे आश्वासन हवेतच, विस्तारित भागातील रस्त्या अभावी नागरिकांचे हाल
Monday To Monday NewsNetwork।
यावल, प्रतिनिधी । शहरालगतच्या आयशा नगर या वस्ती सह विस्तारित वस्त्यांमध्ये रस्ते व गटारी नसल्याने नागरिकांची अतोनात हाल होत असल्याने गेल्या पंधरा दिवसापूर्वी अशपाक शाह व वस्ती धारकांनी येथील नगरपालिके समोर गेल्या पंधरा दिवसापूर्वी उपोषण केले होते नगराध्यक्ष तडवी मुख्याधिकारी बबन तडवी यांनी लवकरच रस्त्याचे काम करून देणार असल्याचे आश्वासन देऊन रहिवाशांचे उपोषण मागे घेतले होते मात्र अद्यापही नगराध्यक्ष यांचे आश्वासन पूर्ण न होता रस्त्याची व गटारीचे कामास सुरुवात झालेली नाही.
शुक्रवारी झालेल्या पावसाने रस्त्याची स्थिती अत्यंत हलाखीची होवून रस्त्यात जागोजागी डबके साचले असल्याने रहिवाशांना पाहिजे चालणेही कठीण होत आहे त्यामुळे त्यांची हाल होत आहेत त्यामुळे विस्तारित वस्त्यांमधील रहिवाशी संताप व्यक्त करत असून येत्या चार दिवसात रस्त्याचे कामास सुरुवात झाली नाही तर पुन्हा पालिकेसमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा अशपाक शहा व इरफान शेख़ ,हाजी बद्रौद्दीन, जुनेद खान ,वसीम पटेल,डॉक्टर सोहेल,हाजी नईम, अजीज पटेल, शफि जनाब ,शैख सुलेमान यांनी दिला आहे.