यावल नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण 2021चा ODF ++ मानाकंनाने प्राप्त, केंद्रीय त्रयस्त कमेटीचा अहवाल !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (प्रतिनिधी)। स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत यावल नगरपरिषदेस यावल शहर स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत ओ.डी.एफ.++ मानाकंनाने प्राप्त झालेला आहे.
यावल नगरपरिषदेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की स्वच्छ सर्वेक्षण 2021अंतर्गत यावल नगरपरिषदेस ओ.डी.एफ.++ मानांकन प्राप्त यावल शहराचे स्वच्छ सर्वेक्षण-2021चे परीक्षण दि.8/3/2021व9/3/2021 रोजी केंद्रीय त्रयस्थ कमेटी मार्फत करण्यात आले होते समितीकडून निरीक्षण नोंदविण्यात आले या निरीक्षणाचा अहवाल आज दि.19/3/2021 शुक्रवार रोजी दुपारी प्राप्त झालेला असून यावल शहर स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत ओडीएफ++ या मानांकन आणि प्राप्त झालेला आहे.
सदरचे अभियान यावल नगराध्यक्षा सौ.नोंशाद तडवी, उपाध्यक्ष तथा गटनेता अतुल पाटील, मुख्याधिकारी बबन तडवी,नोडल अधिकारी रमाकांत मोरे, स्वच्छता निरीक्षक शिवानंद कानडे, कार्यालयीन अधिकक्षक विजय बड़े, अभियंता योगेश मदने,सिटिकॉरीडीनेटर राधा पोतदार यांच्यासह इतर सर्व न.प.कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.