यावल तहसीलदार यांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, ३४ लाखाचा दंड वसुल
यावल,मंडे टू मंडे न्युज । किरण तायडे। यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कंबर कसली असून त्यांनी मागील सहा महिन्यांमध्ये तब्बल 43 अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर तसेच ट्रॅक्टर वरती कारवाई केली आहे ही कारवाई कमी काळात सर्वात मोठी कारवाई असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे .त्यामध्ये एकूण 58 लाख 457 रुपये दंड ठोठावण्यात आला असून त्या पैकी 34 लाख 43 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तर 23 लाख 96 हजार 424 रुपये दंड प्रलंबित आहे .
यावल तहसीलदार म्हणून रुजू झाल्यापासून अवैध वाळू वाहतुकीवर चांगलाच वचक बसला त्या मुळे वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे . नुकतेच यावल मध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वरती तहसीलदार मोहन मला नाझीरकर यांच्यासोबत पथक दाखल झाले, सदर डंपर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयात जमा करण्यास आणले जात असताना रस्त्यातच ड्रायव्हर यांनी पळ काढला होता त्यावेळेस डंपरमध्ये तलाठी तेजस पाटील हे बसले होते समय सूचकता दाखवून भालोद येथील तलाठी भारत वानखेडे यांनी चालू डंपर वर चढून अनेक महसुली कर्मचाऱ्यांना होणाऱ्या हानीपासून वाचविले होते .परंतु सदर कारवाई करत असताना महसुली कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे .तसेच अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी यावल पोलीस प्रशासनाने सुद्धा महसूल विभागात सहकार्य केले तर अवैध वाळू वाहतुकीस आळा बसण्यास मदत होईल.
यावल नगरपरिषद साठवण तलाव परिसराकडून बोरावल- टाकरखेडा रस्त्यावर खंडेराव मंदिरा जवळून अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती आज दि.२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८:३० ते ९:३० वाजेच्या सुमारास मिळाल्याने यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीकर यांनी स्वतः व महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूकदारांवर बेधडक कारवाई करून दोन्ही ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयात जप्त करून पुढील कार्यवाही सुरू केली.यावल तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन करून अवैध वाळू,अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना भेदभाव, पक्ष-पातीपणा न करता तसेच कोणाच्याही प्रभावाला बळी न पडता सातत्याने कारवाई होत असल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सदर कारवाई करताना प्रामुख्याने यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्या उपस्थितीत बामणोद मंडळ अधिकारी सौ.बबीता चौधरी,यावल तलाठी ईश्वर कोळी,साकळी येथील तलाठी मिलिंद कुरकुरे,तहसीलदार यांचे वाहन चालक अरविंद बोरसे इत्यादी महसूल कर्मचारी पथकाने बेधडक कारवाई केली.
यावल तालुक्यात गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर कारवाई करून जास्तीत जास्त प्रमाणात महसूल वसूल झाला आहे आणि यापुढे सुद्धा जास्तीत जास्त महसूल कसा वसूल होईल याकडे संपूर्ण महसूल विभागाने लक्ष केंद्रित करून कोणाच्याही दडपणाला प्रभावाला बळी न पडता अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई होणार असल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.व यापुढेही अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी “मंडे टू मंडे न्युज ” चे प्रतिनीधी किरण तायडे यांना सांगितले