यावलकरांना कोरोनाची भीती राहिलेली नाही.पोलिसांची दंडात्मक कारवाई.पालिका मात्र बेफिकीर.
Monday To Monday NewsNetwork।
यावल (सुरेश पाटील)। यावल शहरात बुरूज चौकापासून तर गवतबाजारा पर्यंत आणि सुदर्शन चित्र मंदिराकडील परीसरात आणि ईतर ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची, औषधाची दुकाने वगळता इतर जनरल वस्तू आणि रेडिमेट तसेच कापड दुकाने कोरोना बाबतचे नियम खड्ड्यात घालून आपापले व्यवसाय करून ग्राहकांची गर्दी करून घेत असल्याने यावल पोलिसांनी आज दि.7शुक्रवार रोजी सकाळी10 वाजेच्या सुमारास दंडात्मक कारवाई केल्याने यावल शहरातील मुख्य रस्त्यावर व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली.यावल नगरपालिका सतत दंडात्मक कारवाई करीत नसल्याने यावल नगरपालिका कोरोना बाबत बेफिकीर झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यावल शहरात महाजन टी डेपो जवळ तसेच काजीपुरा मज्जिद जवळ काही व्यापाऱ्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करून आपआपली दुकाने बिनधास्तपणे उघडल्याने यावल पोलिसांनी आज सकाळी10 वाजेच्या सुमारास दंडात्मक कारवाई केली.यावल शहरातील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी
कोरोना नियमाचे पालन करण्यासाठी यावल पोलिसांनी यावल नगरपालिकेने फक्त1ते2फेऱ्या मारून किरकोळ स्वरूपाची कारवाई न करता दिवसभर बंदोबस्त वाढवून कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यां विरुद्ध दंडात्मक कारवाई करायला पाहिजे असे खुद्द व्यापारी वर्तुळात बोलले जात आहे. यावल शहरात मेन रोडवर बुरुज चौकापासून डॉ.देशमुख यांच्या हॉस्पिटल समोर,आणि महाजन गल्लीत जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर किरकोळ व्यापाऱ्यांची, हातगाडीवाल्याची,भाजीपाला विक्रेत्यांची व इतर वस्तू विक्रेत्यांची मोठी गर्दी होत असते त्याच प्रमाणे बुरूजचौकापासून तर गवत बाजारापर्यंत मुख्य बाजारपेठ रस्त्यावर इतर मालवाहतूक मोठ्या व लहान वाहनाची,रिक्षाचालकांची नागरिकांची दुचाकी गाड्यांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते बेशिस्त वाहतूक यामुळे मात्र पायदळ चालणाऱ्या स्त्री-पुरुषांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बियरबार चौकात रिकामटेकडे यांच्यासह किरकोळ व्यवसायिक सुद्धा मोठी गर्दी करीत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असतो याकडे यावल पोलिसांनी यावल नगरपालिकेने आपले लक्ष केंद्रित करून वाहतूक सुरळीत होणे कामी दंडात्मक कारवाई करावी तसेच कोरोना कालावधीत कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या दुकानदारांवर किरकोळ स्वरुपाची कारवाई न करता मोठ्या स्वरूपात दंडात्मक कारवाई करून जनहित आणि नागरिकांचे आरोग्य हित जोपासावे अशी संपूर्ण यावल शहरातून मागणी होत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महीना असल्याने मेन रोडवर रिकामटेकड्या नागरिकांसह अनावश्यक वाहनांची गर्दी कमी कशी करता येईल याबाबत यावल नगरपालिका आणि यावल पोलिसांनी सयुक्तिकरित्या नियोजन करून यावल शहरातील मुस्लिम बांधवांचा रमजान सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पाडणे कामी बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कारवाई करावी.जेणेकरून यावल शहरात कायदा व सुव्यवस्था,जातीय सलोखा कायम राहील.