भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

यावल येथे तरुणाचा डेंग्यूच्या आजारामुळे मृत्यू !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथील गणपती नगरातील एका आदिवासी तरुणाचा डेंग्यूच्या आजारामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान दुदैवी मृत्यु झाल्याची घटनासमोर समोर येत असून घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, दिनांक ९ सप्टेंबर रोजी शहरातील विस्तारित क्षेत्रातील वसाहतील गणपती नगर मधिल राहणारा २३ वर्षीय उच्चशिक्षित आदीवासी तरूण सादीक गनी तडवी या तरूणास हिवताप व वांत्या झाल्याने त्यास उपाचारादाखल केले असता निदानात त्यास डेंग्यु झाल्याची पुष्टी मिळाली व दिनांक ११ सप्टेंबर रोजी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुदैवी मृत्यु झाल्याची घटनासमोर आली. या डेंग्युमुळे मरण पावलेल्या तरूणावर आज सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार (दफनविधी) करण्यात आली.

यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात मागील काही दिवसांपासुन काही ग्रामपंचायत आणी आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षीत कारभारामुळे मोठया प्रमाणावर डेंग्युचे रूग्ण आढळुन आले. यावल नगर परिषदच्या क्षेत्रात देखील गेल्या अनेक महीन्यापासुन जंतुनाशक फवारणी करण्यात आली नसल्याने तसेच स्वच्छता मोहीम देखील मंदावल्याने नगर परिषदच्या भोंगळ व दुर्लक्षित कारभारामुळे परिसरातील नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!