गावठी पिस्तुलासह तरुण अटकेत
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल तालुक्यातील यावल-किनगाव रस्त्यावर गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया हा २८ वर्षीय तरुण लोखंडी गावठी पिस्तुल बाळगताना आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, तालुक्यातील किनगाव – यावल रस्त्यावरील मेष ठिबक कंपनीजवळ दि १२ रोजी ३ वाजेच्या सुमारास एक २८ वर्षीय तरुण काळ्या रंगाच्या दुचाकीसोबत ३० हजार रुपये किमतीची गावठी पिस्तुल व मॅक्झीनसह आढळून आला. संशयित आरोपी गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया,वय २८, रा. बेह्राम्पुरातील जि.खरगोन मध्यप्रदेश येथील रहिवासी असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यावल चे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाहले हे करीत आहेत.