यावल येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या
यावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। यावल शहरातील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या सागर बापू पाटील वय ३० वर्ष या विवाहित तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली.
यावल येथील शिवाजी नगरात सागर बापू पाटील हा पत्नी व चार वर्षाच्या मुलासह राहातो. सागर हा यावल येथे बसस्थानजवळील एका बॅटरीच्या दुकानावर कामास होता. मी घरून जेवण करून येतो असे तो दुकान मालकास सांगून घरी आला असता पत्नी शेतात व मूलगा शिकवणीला गेला असता आज दि.१७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता घरात एकटे असताना छताला दोरी बांधून गळफास घेतला,सागरची पत्नी शेतातून घरी आल्यावर दरवाजा उघडून बघितला असता सागरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आल्याने हंबरडा फोडला,वाड्यातील तरूणांनी धाव घेवून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी मयत घोषीत केले, या बाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे