युवारंग 2022 : विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धानी गाजविला युवा रंगाचा दुसरा दिवस
फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। युवारंग 2022 , आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर विविध स्पर्धांचा वर्षाव पाहायला मिळाला, युवा रंगात आज विविध कलाप्रकार साधार करण्यात आले एकूण पाच रंगमंचां वर विविध प्रकारच्या कलाविष्कारांना खूप मोठ्या प्रमाणात दाद मिळाली यात…
रंगमंच क्रमांक 01 वर : सकाळी मूक अभिनय व दुपारी तीन नंतर मिमिक्री हे कलाप्रकार सादर करण्यात आले.
सकाळी या ठिकाणी मूकनाट्य हा कल्प्रकर सादर करताना मूक अभिनयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक, शेतकरी आत्महत्या, स्त्रीभून हत्या, हुंडाबळी बालविवाह प्रदूष स्त्रियावर होणारे अत्याचार तसेच शेतकऱ्यांची आत्महत्या भ्रष्टाचार मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत, गांधीजी के तीन बंदर, माध्यमांमुळे विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार , शाळा महाविद्यालय अशा विविध ठिकाणी होणाऱ्या विविध घटनांवर मूक अभिनयाच्या माध्यमातून प्रकाश टाकला
रंगमंच क्रमांक 02 वर पाश्चिमात्य समूह गायनसाठी 05, पाश्चिमात्य सोलो गायनसाठी 12, आणि पाश्चिमात्य वाद्य संगीत यासाठी 06 स्पर्धक संघांनी भाग नोंदविला, एकूण तीन स्पर्धांमध्ये स्पर्धा भरण्यात आली होती या स्पर्धेत पाश्चिमात्य गीतांच्या माध्यमातून मैफिलीला रंग देण्यात आली वेगवेगळ्या प्रकारचे बॉलिवूड आणि हॉलिवूडचे गाणे या ठिकाणी अत्यंत मधुर आवाजात गायले गेले, पाश्चिमात्य शैलीत सादर करण्यात आलेल्या पाचशे मात्र समोर गायन आणि पाश्चात्य सोलो गायन या दोन्ही स्पर्धा मधील सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने आपली गायनाची कला सादर केली
रंगमंच 03 : आज अतिशय बौद्धिक विचारांनी भरलेला दिसला रंग म्हणजे तीन वर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी 61 विद्यार्थी अनुकूल आणि प्रतुक व प्रतिकूल या दोन्ही बाजूने बोलत बोलत होते या स्पर्धेसाठी देण्यात आलेला विषय हा भारतीय राज्यघटनेनुसार भारतात लोकशाही अमलात आहे का हा विषय विद्यार्थ्यांसाठी खूप आव्हानात्मक ठरत असला तरीसुद्धा स्पर्धक विद्यार्थ्यांनी अतिशय उस्फूर्तपणे आणि वैचारिक मांडणी करताना दिसले अनेक विद्यार्थ्यांनी भारत हा खंडप्राय देश असला तरी यातील बहुसंख्य समाज विशिष्ट जाती धर्म प्रांत भाषा बोली संस्कृती आचार विचार संस्कार यांनी नटलेला देश आहे या सर्व बाबी लक्षात घेता इथली लोकशाही परंपरा अत्यंत उत्तम आहे आणि ती लोकशाही परंपरा टिकविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना ही एकमेव उत्तम आधार आहे असे मत मांडत असताना लोकशाही मूल्य, समानता, हक्क आणि जबाबदारी, यासाठी व त्यातून बंधुत्व टिकण्यासाठी ज्या गोष्टींचा भारतीय राज्यघटनेमध्ये विचार मांडला आहे त्या विचारांचे कायद्यात रूपांतर करून हा भारत सार्वभौम सत्ता म्हणून कशा पद्धतीने या सर्व लोकशाही मूल्यांचा संरक्षण करत आहे याचे स्पष्टीकरण विविध कलम, कायदे आणि उपकलम यांची अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थी भारतात लोकशाही किती कणखर आहे याचे उदाहरण सांगत देत होते,अनेक विद्यार्थ्यांनी असेही सांगितले की राज्यघटनेत केलेल्या तरतुदीमुळेच राजा असो की रंक असो, अमीर असो गरीब असो, नेता असो किंवा अभिनेता असो कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही म्हणूनच सलमान खानने एका निरपराध मुक्या प्राण्याला जेव्हा गाडीने उडविले तेव्हा त्याला सुद्धा तुरुंगात जावे लागले आणि अजूनही त्याच्यावर खटला चालूच आहे, भारतात कायदे पाळले जातात, कायद्यांचे राज्य आहे म्हणूनच लोकशाही शाबूत आहे अनेक मोठमोठे पुढारी आजही तुरुंगात आहेत, चारा घोटाळा मध्ये लालूप्रसाद यादवांना तुरुंगात जावे लागले, मुद्रांक घोटाळा मध्ये चिदंबरमना तुरुंगात जावे लागले तसेच आजही देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तसेच मुद्रांक घोटाळ्यामुळे अब्दुल करीम तेलगी याला तुरुंगात जावे लागले आणि अस्या अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यत अडकलेले पुढारी,नेते,अभिनेते यांना त्यांच्या अवैध कृत्यामुळे तुरुंगात जाताना पाहत आहोत, या सर्व गोष्टी एकच दर्शवितात की राज्यघटनेत कोणताही भेदभाव न करता गुन्हेगार हा केवळ गुन्हेगारच आहे या दृष्टीने कार्यवाही केली जाते, प्रत्येकाला समान न्याय देण्याचे काम व लोकशाही व्यवस्था टिकून ठेवण्याचं काम राज्यघटनेतील तरतुदी मुळेच होणे शक्य आहे अन्यथा इथल्या लोकांना गुलामगिरीने, हुकूमशाहीने, कधीच गिळंकृत केले असते,जर राज्यघटना राहिली नसती तर हा देश वाचविणे कठीण झाले असते, म्हणून अनुकूल बाजूने मत मांडत असताना लोकशाही भारतात अतिशय चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे आणि त्याचा मुख्य कारण म्हणजे भारतीय राज्यघटना असे मत मांडले,
प्रतिकूल
प्रतिकूल बाजूने बोलत असताना विद्यार्थ्यांनी तेवढेच प्रभावीपणे तर्क मांडले अनेक विद्यार्थ्यांनी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या देशावर माझे प्रेम आहे असे असून सुद्धा या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांमध्ये ज्या पद्धतीने छुप्या जातीवादाचा धर्मवादाचा आणि प्रस्थापितांचा शिरकव झालेला आहे तो इथली बंधुता , इथलं सर्व धर्म समानता इथले सार्वभौम सत्ताक, प्रजेचे राज्य आणि इथली न्यायव्यवस्था पूर्णपणे मोडीत काढत आहे , निर्भया हत्याकांड, एका मुलीचे 35 तुकडे करून फेकून देणारा नराधम, स्त्रियांवर होणारे रोजचे अत्याचार,वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे, सामाजिक आंदोलने त्या आंदोलनाच्या माध्यमातून उमटणाऱ्या सामाजिक प्रतिक्रिया, वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक प्रतीके, समाज सुधारकांना सुद्धा या देशात वेगवेगळ्या वर्गात विभाजून जातीचा आणि धर्माचा मुलामा चढवला आहे, त्यांना एक राष्ट्रीय नेतृत्व न मानता एक सामाजिक नेतृत्व या ठिकाणी करून सोडलेला आहे म्हणूनच विशिष्ट प्रकारच्या नेत्यांचा विशिष्ट प्रकारचा समुदायाच गौरव करत असताना दिसत असतो या सगळ्या गोष्टी उघडपणे पाहत असताना प्रत्यक्ष जाणवतं या देशात कायद्याचं राज्य हे कधीच संपलेल आहे आणि या देशात टोळ्या टोळ्यांचे राज्य उदयास आलेले आहे म्हणून, भारतीय समाजात लोकशाही अस्तित्वात नाही असे प्रकर्षाने जाणवू लागले आहे अनेक कायदे असताना सुद्धा ज्याच्या हातात सत्ता आहे तो सत्तेचा गैरवापर करून लोक गरिबांवर, स्त्रियांवर, अनेक निरपराध लोकांवर अत्याचार करत आहेत, कायदे सक्षम असून सुद्धा कायद्याचं पालन या ठिकाणी सक्षमपणे केले जात नाही म्हणून सामान्य माणूस हा पोलिसांकडे, न्यायव्यवस्थेकडे जाण्यासाठी घाबरत असतो वर्षानुवर्षे न्याय मिळत नाही म्हणून न्यायदेवतेकडे न्यायची भीक मागण्यासाठी सुद्धा लोक जात नाहीत, न्याय मिळत नाही म्हणून नाही मागायचा कशाला अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात निर्माण होत असेल तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकशाही जिवंत आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे,
म्हणूनच आपण पाहतो ताजमहल असो जामा मशीद असो, राम मंदिर असो, किंवा अनेक असे धार्मिक स्थळ असो या धार्मिक स्थळांचा वापर सर्रासपणे सामाजिक ध्रुवीकरणासाठी केला जात आहे, हे सामाजिक ध्रुवीकरण लोकांमध्ये भेदाभेद निर्माण करत असते आणि या भेदाभेदा मुळेच सामाजिक स्वास्थ्य नष्ट होत असते, अशा प्रकारचे सामाजिक स्वास्थ्य नष्ट झालेले लोक रोज सर्रासपणे समाजात वावरताना दिसतात अश्या विध्वंसक लोकांच्या पाठीमागे मोठे राजनीतिक पक्ष नमकित व्यक्तिमत्व साधू, संत, पुढारी अधिकारी हे ठिकाणी काम करत असताना दिसतात म्हणूनच समाजात सर्रासपणे गुन्हे होताना दिसत आहेत, म्हणूनच भारतीय समाजात लोकशाही मूल्यांची पूर्णपणे अवहेलना केली जाते भ्रष्टाचार या ठिकाणी शिष्टाचार झालेला आहे शिक्षण महाग झाल्यामुळे गरिबांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळत नाही सरकारी शाळा पडलेले आहेत त्यांच्यात सुविधांचा खूप मोठ्या प्रमाणावरती अभाव आहे, युवकांना नोकरी नाही रोजगार नाही काम धंदा नाही शेतकऱ्यांचे आंदोलने सर्रासपणे दुर्लक्षित केले जातात नोकरशाही मनमानी कारभार करत आहे युवकांकडे त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते आहे, त्यांना खोटी आश्वासने दिली जातात त्यांना धार्मिक चंगळवादाकडे वळविले जाते अशा अवस्थेत वैफल्यग्रस्त झालेले युवक वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये सामील होत असतात आणि सर्रासपणे गुन्हेरेगारी प्रवृत्तीकडे वळत असतात हे या समाजाचे चित्र आहे म्हणून भारतत लोकशाही ही फक्त नावापुरतीच उरली आहे अशा प्रकारचे परखड मत सुद्धा या ठिकाणी स्पर्धकांनी मांडले
रंगमंच 4 वर भारतीय सुगम संगीत, व भारतीय शास्त्रीय गायन हे कलाप्रकार सादर करण्यात आला या कलाप्रकारात अनुक्रमे 30 व 11 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला या सर्व महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी भारतीय सुगम संगीत या भारतीय सुगम संगीतातल्या वेगवेगळ्या चालीवर विविध राग सादर करत आपली कला सादर केली
रंग क्रमांक पाचवर तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या त्यात एक चिकट कला माती कला आणि इन्स्टॉलेशन अशा तीन कला प्रकारांमध्ये चिकट कलेसाठी 35 स्पर्धक संघ माती कलेसाठी 32 स्पर्धक संघ आणि इन्स्टॉलेशन साठी 40 स्पर्धक संघांनी भाग नोंदविला चिकट कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय एकात्मता विविधतेतून म्हटलेला भारत निसर्ग चित्र व्यंगचित्रे अशा विविध प्रकार सादर केले, माती कलेतून मदतीसाठी उगवलेले हात प्रेम संबंध विविध प्रकारच्या मुद्रा शृंगार रस मातृत्व वात्सल्य असे अनेक प्रकारच्या कला मूर्तिमंत उभारून आपल्या कलेचे प्रदर्शन केले