यावलसामाजिक

“मंडे टू मंडे न्युज” ची दखल : निंबादेवी धरणासह चार ठिकाणी पर्यटनास मज्जाव

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : निंबादेवी धरण ओव्हरफ्लो,धरणावर हजारो पर्यटकांची गर्दी,नियम धाब्यावर, अतिउत्साही तरुणांची धुडघुस आशा आशयाची बातमी  काल ‘मंडे टू मंडे न्यूजला प्रकाशित होताच दखल घेत आज तेथील यावल तहसीलदार यांनी निंबादेवी धरणासह चार ठिकाणी पर्यटनास मज्जाव करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

यासंदर्भात कालच ‘मंडे टू मंडे न्यूज’ने बातमी प्रकाशित केली होती; जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने सातपुडा पर्वतरांगेतील चिंचपाणी, मनुदेवी, वाघझिरा व निंबादेवी धरण (nimbadevi dam) परिसर पर्यटकांनी याठिकाणी ट्रेकिंगसह पाण्यात आनंद घेता यावा अनेक जण विकेंड घालवण्यासाठी येथे येत आहेत. या ठीकणी कुठलाही पोलीस बंदोबस्त नाही अथवा पाटबंधारे चे अधिकारी, या ठीकाणी शासनाच्या नियमांची सऱ्हास पायमल्ली होताना दिसत आहे, येथे अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघातही घडल्याची उदाहरणे आहेत असा उल्लेख बातमी करण्यात आला होता. यामुळे प्रशासनावर टिकेची झोड उठली होती. सध्या पाऊस सुरू असल्याने सतर्कता म्हणून धरण परीसरात पर्यटकांना प्रवेश बंद करीत पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

बातमी प्रकाशित झाली आणि याची दखल घेत या अनुषंगाने यावलच्या तहसीलदारांनी आज बैठक घेत निर्देश जारी करत निंबादेवी धरणावर पर्यटनास जाण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे. या निर्देशांमध्ये निंबोदेवी धरणासह मनुदेवीचा धबधबा, वड्री धरण आणि हरीपुरा धरण या चार ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. हे निर्देश पुढील सूचना येईपर्यंत जारी करण्यात आल्याचे यावल तहसीलदारांनी नमूद केले आहे.

यासंदर्भातील तहसील कार्यालयाच्या बैठक घेण्यात आली या बैठकीत तहसीलदार महेश पवार, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रादेशिक वनविभाग पश्चिमचे वनक्षेत्रपाल उपस्थित होते. या बैठकीत दक्षता म्हणून निर्णय घेण्यात आला व यावल पोलिसांच्या वतीने धरण परीसरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

संबंधित बातमी : निंबादेवी धरण ओव्हरफ्लो,धरणावर हजारो पर्यटकांची गर्दी,नियम धाब्यावर, अतिउत्साही तरुणांची धुडघुस

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!