विवाहितेचा छळ,पतीसह ८ जणांवर यावल पोलीसात गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल येथील माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेचा पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून छळ केल्याने २७ नोव्हेंबर रोजी पतीसह ८ जणांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आसमाशेख मोहम्मद नदीम ,वय-२९, रा – वडाळा नाशिक , ह..मु. गंगानगर, यावल ,यांचा विवाह नाशिक येथील मोहम्मद नदीम शेख यांच्याशी २०१३ मध्ये झाला. काही दिवसांनी पती मोहम्मद नदीम याने विवाहितेला माहेरहून फ्लॅट घेण्यासाठी पैशांची मागणी केली. विवाहितेच्या आई-वडिलांनी पैसे दिले.नंतर तोच प्लॅट गहाण ठेवून पती मोहम्मद नदीम याने पुन्हा भाड्याचे घर घेण्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी केली.शिवीगाळ व मारहाण केली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. नंतर पतीसह सासू – सासरे नणंद, फुवा आणि चुलत दीर यांनी विवाहितेच्या यावल येथील घरी २३ नोव्हेंबर रोजी शिवीगाळ केली.
विवाहितेच्या फिर्यादीवरून पती मोहम्मद नदीम शेख, सासरे समसोद्दिन शेख, सासू यास्मिनबी शेख, दिर आजीम शेख, नणंद अंजुमनबी शेख, फुवा मुक्तार शेख, शफिक शेख आणि चुलतदीर जुबेर शेख , सर्व रा. नाशिक ,यांच्याविरोधात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .