राजकीय प्रभावामुळे पिवळ्या मातीचा होतो ” गाळ “; शेतकऱ्यांच्या नावावर गौण खनिजाची लूट आणि शासनाच्या तिजोरीला चुना
यावल, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | यावल रावेर तालुक्यात राजकीय प्रभावामुळे पिवळी माती वाहतूक करताना ती पिवळी माती जादूने गाळ होत असल्याचे बोलले जात आहे. आणि या पिवळ्या मातीचे वाहतूक करणाऱ्या वाहने यावल पोलीस,यावल तहसील कार्यालयाच्या समोरून बिनधास्तपणे सुसाट वेगाने धावत आहेत.
यावल रावेर तालुक्यात अनेक ठिकाणी खाजगी उद्योग व्यवसायासाठी आणि बिनशेती जागांवर जेसीपी मशिनरीच्या साह्याने उंच टेकड्याचे सपाटीकरण करून त्या ठिकाणची पिवळी माती व्यावसायिक वापरासाठी वापरली जात असून प्रत्यक्षात मात्र माती वाहतूक करताना शासनाला रॉयल्टी भरावी लागते परंतु रॉयल्टी लागू नये म्हणून संबंधित अवैध गौण खनिज वाहतूक करणारे मात्र महसूल विभागाच्या डोळ्यात धुळ फेक,दिशाभूल,फसवणूक करून माती ऐवजी गाळ वाहतूक करीत असल्याचे कांगावा करतात अनेक बेकायदा गौण खनिज वाहतूक करणारे आपला व्यवसायिक आर्थिक हेतू साध्य करून दिवस रात्र सुसाट वेगाने वाहने चालवत आहे डंपर मधून माती वाहतुक होत असताना इतर दुचाकी,चार चाकी वाहनधारकांना नागरिकांना पायदळ चालणाऱ्यांना उडणाऱ्या मातीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
माती वाहतूक करणारे वाहनधारक त्या मातीवर फट,ताडपत्री का टाकत नसल्याने आणि ती माती सर्वत्र उडत असल्याने रस्त्यावर पडत असल्याने याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होत आहे असे का..होत आहे असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो.यात राजकारणाशी संबंधित राजकीय प्रभावामुळे मनमानी करीत असून शासनाच्या तिजोरीला कोट्यावधी रुपयाचा चुना लावला जात आहे.त्यामुळे यावल तहसीलदार यांनी आपल्या महसूल पथकाच्या माध्यमातून पिवळी माती वाहतूक करणारे डंपर,ट्रॅक्टर वाहनांची तपासणी करून त्या वाहनात गाळ आहे की पिवळी माती आहे..? गाळ वाहतूक कुठून कुठे..? आणि कोणत्या ठिकाणी होत आहे.
गाळ वाहतूक परवानगी कोणत्या धरणातून मिळाली आहे,गाळ वाहतूक संदर्भात वाहतूक करणाऱ्याने ऑनलाइन बुकिंग किंवा परवानगी घेतलेली आहे का..? याची चौकशी व खात्री करून अवैध गौण खनिज धारकांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्यक्ष जागेचे, ठिकाणांचे स्थळ पंचनामे करून संबंधित जागा मालका विरुद्ध दंडात्मक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.