सार्वजनिक शौचालयाची देखभाल अभावी दुरवस्था,निकृष्ट कामाची चौकशी न करता बिले काढली जातात
Monday To Monday NewsNetwork।
यावल ( प्रतिनिधी)। तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायत प्रशासन बेघर वस्तीत महिलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीची वारंवार मागणी करून देखील दुरुस्त करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
केंद्र व राज्य शासनाने ग्रामस्वच्छतेस प्राधन्य दिलेले असतांना यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात परसाडे मार्गावरील बेघर वस्तीत असलेल्या महिलांसाठीच्या सार्वजनिक शौचालयाची देखभाल अभावी दुरवस्था झाली असून ते कुठल्याही क्षणी कोसळण्याची भीती असून ते मृतावस्थेत आहे. त्या मुळे महीलांची मोठी गैरसोय होत असल्याने या बाबत वारंवार तोंडी तक्रार ग्राम पंचायतीकडे करून देखील या महिलांच्या व त्या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे कारभारी बेजबाबदारपणे वागणुक देवुन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान डोंगर कठोरा ग्रामपंचायतच्या माध्यमातुन मागील दोन वर्षापासुन शासनाच्या विविध विकास कामांसाठीच्या मिळालेल्या लाखो रुपयांच्या निधीच्या माध्यमातून अत्यंत निकृष्ठ प्रतीची सर्व कामे करण्यात आली असल्याचा ही आरोप करण्यात आला. अनेक तक्रारी असताना सुद्धा या निकृष्ट कामाची चौकशी न करता त्याची बिले काढली जात असल्याने अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहे.