यावल महसूलची दिशाभूल करून अवैध गौण खनिजची सर्रास वाहतूक
सावदा, ता. रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। यावल तहसील पासून ३ किलोमीटर अंतरावर यावल भुसावळ रोडवर बिनशेती झालेल्या अर्ध विकसित जागेवरून तसेच बिनशेती होण्याच्या आधी शेत जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या नावाखाली जेसीबी मशीन द्वारा पिवळ्या मातीचे उत्खनन करून कोणताही परवाना न काढता सर्रासपणे वाहतूक सुरू असून शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवून काही लोक आपली चांदी करून घेत आहेत, गेल्या आठ दिवसापासून उद्योग सुरू आहे आज शनिवार रविवार सुट्टी असल्याने सोयीनुसार वाहनातून माती वाहतूक सुरू आहे
या अवैध गौण खनीज वाहतुकीकडे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आणि यावल तहसीलदार यांनी तात्काळ कारवाई करावी अशी गौण खनिज वाहतूक वाहनधारक क्षेत्रातून मागणी होत आहे.