भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

नदीजोड प्रकल्पांचे पाणी नागादेवी तलावात सोडा;जलसंपदामंत्र्याकडूननिवेदनाची दखल

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्यातील निंबादेवी धरण येथील सांडपाण्याचे पाणी नागादेवी पाझर तलावात सोडण्याबाबत यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबईत जयंत पाटील ,जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले निंबा देवी धरण या पावसाळ्यात धरण पूर्णपणे भरले असून नदी विसर्ग सुरू आहे निंबा देवी धरणातले पाणी सांडव्यातून पुढे वाया जात असून ते पाणी नदी जोड प्रकल्प अंतर्गत नागादेवी पाझर तलावात सोडल्यास त्या परिसरातील दहीगाव ,सावखेडा ,चुंचाळे बोराळे, विरावली ,कोरपावली, मोरडा, महेलखेडी ,नागा देवी, नायगाव या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना शेतीसाठी व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याच प्रकारची समस्या जाणवणार नाही व नदीजोड प्रकल्पांतर्गत वाया जात असलेले पाणी नागादेवी पाझर तलावात सोडल्यास सातपुडा पायथ्याशी असलेल्या सर्व परिसर यांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. देवकांत बाजीराव पाटील यांनी निवेदनाद्वारे ना. जयंत पाटील यांच्याकडे केली याप्रसंगी राष्ट्रवादी विधानसभेचे विधानसभा प्रमुख अनिल साठे, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील,राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष पवन पाटील आदींनी निवेदन दिले या निवेदनासाठी विधानसभेचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी ,देवकांत पाटील यांचे निवेदनाची शिफारस केली होती याच शिफारसची दखल घेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधून निर्णय घेऊ असे सांगितले .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!