भरधाव रिक्षाची दुचाकीस धडक : दुचाकीस्वारास जागीच ठार !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील मनवेल-साकळी रस्त्यावर आज दुपारी ३:१० वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, आज मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तालुक्यातील भास्कर उखा भील (वय ६२) राहणार साकळी हे आपल्या दुचाकीने कामावरून साकळी ते मनवले रस्त्याने साकळी येथे जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षा (एमएच १९ एजे ०१९४) ने दुचाकीचा जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात भास्कर भिल यांचा जागीच मृत्यू झाला. सदरील अपघात होता रिक्षा चालक रिक्षा सोडून घटनास्थळा वरून पळ काढला. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात मयताचा मुलगा ताथु भास्कर भिल याच्या फिर्यादीवरून रिक्षा पोलीसात जमा करत रिक्षा चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.