यावल शहरासह तालुक्यात खुलेआम घातक रसायन मिश्रीत पन्नीच्या दारूची विक्री
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल शहरात सुतार वाडा लागून झोपड पट्टी,सुंदर नगरी,बोरावल गेट,आठवडे बाजार चौक, पोलीस स्टेशन परिसर व पचांयत समिती परिसर अशा अनेक जागी अवैध धंदे सुरू असून पोलीस प्रशासन पूर्ण पणे बघ्याची भूमिका घेत आहे त्याच प्रमाणे तालुक्यात सर्वत्र मानवी जिवनास अत्यंत धोकादायक पन्नीची दारूची खुलेआम विक्री अल्पवयीन मुलापासुन तर तरुणापर्यंत पहोचली आहे. या मुळे अनेकांचे कुटुंब उद्धवस्त होण्याच्या मार्गावर असुन शिवाय अशा प्रकारे मिळणाऱ्या दारूमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुलीकर बुडत आहे.
यावल तालुक्यात मागील अनेक दिवसांपासुन प्राण्यांवर वापरण्यात येणारी ऑक्सीटॉसीन इंजेकशन , बॅटरीत वापरण्यात येणारी सेल अशा अनेक प्रकारच्या अत्यंत घातक रसायनाव्दारे तयार होत असलेली दारू ही पन्नी च्या पाऊच मध्ये गल्ली बोळापासुन तर सर्वत्र शाळा परिसरासह सार्वजनिक ठिकाणी १०ते २० रुपयापर्यंत राजरोसपणे विक्री केली जात असल्याने दारूच्या आहारी जावुन शाळकरी अल्पवयीन मुलांपासुन तर तरूण वर्ग, मोलमजुरी करून कुटुंबाचा उदर र्निवाह करणारे मजुरवर्ग व्यसनाधीन होवुन किडनी , लिव्हरला धोका उत्पन्न होवुन मृत्युच्या सापळ्यात अडकत आहे.या मुळे अनेक तरूणांच्या आयुष्याची राखरांगोळी होवुन संपुर्ण कुटुंब उद्धवस्त होत असल्याची भयावह करणारी ह्वदयविदारक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली असुन बिनधास्तपणे खुलेआम विक्री होणाऱ्या पन्नीच्या दारू विक्रेत्यांवर कारवाई व्हावी.