न्हावी येथे सट्टा-मटका मालक जोमात; जुगार खेळणारे कोमात ! सट्टाचालू करण्यासाठी पोलिसांचा दबाव !
फैजपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : येथून जवळच असलेल्या न्हावी गावात सट्टा घेणाऱ्यानी संप पुकारल्यानंतर जिल्ह्याभरात पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमते बाबत मोठी चर्चा सुरू असतांना पत्ता जुगार खेळणाऱ्यांवर फैजपूर पोलिसांनी कारवाई करत पाच जुगाऱ्याना अटक करत वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सट्टा घेण्यासाठी म्हणजेच सुरू करण्यासाठी पोलीसच दबाव टाकत असल्याचा प्रकारही घडत आहेत.
यावल (yawal) तालुक्यातील न्हावी गावांत सध्या एक नवीनच संपकरी चर्चेत आले आहेत. (Satta Matka) बिट घेणाऱ्यांनीच संप पुकारला असून अवैध धंद्यात देखील संप पुकारला जाऊ लागल्याने आश्चर्य वाटत आहे. न्हावीत ही एक ऐतिहासिक घटना आहे. यादरम्यान, आज २ आगस्ट मंगळवार रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास न्हावी गावातील बस स्टँड परिसरातील बेहरंम बाबा मंदिरा जवळील ओट्यावर गावातील पाच जण ५२ पत्त्याचा जुगार खेळत असताना कारवाई करत पोलीसांनी ताब्यात घेत वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र, या बाबत जनतेतून असा प्रश्न विचारला जात आहे की, सट्ट्याचे आकडे लिहणाऱ्यांनी कमिशन वाढवून मिळावे म्हणून संप पुकारल्याने पोलीसदादा कडून सट्टा घेणाऱ्यांवर सट्टा घेण्यासाठी सुरू करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याची खात्री लायक माहिती मिळत असून यासाठी पोलीस वाहन गावात फिरवण्यात आले.
म्हणजे एकीकडे सट्टा-मटका सुरू करण्यावर दबाव, तर दुसरीकडे जुगाऱ्यांवर कारवाई, हे गौडबंगाल काय? हेच समजेनासे झाले आहे. जुगार खेळांऱ्यांकडून हप्ता पोहच होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाल्याची चर्चा गावात ऐकायला येत आहे. म्हणजे सट्टा-मटका मालक जोमात, तर पत्ता-जुगार कोमात! अशी परिस्थिती निर्माण झाली असून या बाबत पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे…..