क्राईमयावल

किनगाव बसस्थानकावरील दुकान फोडले,२२ हजारांचा ऐवज लंपास

Monday To Monday NewsNetwork।

यावल(प्रतिनिधी)। तालुक्यातील किनगाव येथील बसस्थानकावरील दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले ही घटना शुक्रवारी उघडकीस आली यात रोख रक्कमेसह २२ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला या बाबत येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील किनगाव येथील राजू कडू लोहार यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार किनगाव बसस्थानकावर त्याचे हॉटेल,व शिव पान सेंटर असे पान मसाला दुकान आहे गुरूवारी सांयकाळी दुकान बंद केल्यानंतर शुक्रवारी पहाटे पाच वाजेला दुकान उघडण्या करीता गेलो असता दुकानाचे शटर वाकविलेले दिसले त्यावेळी मी दुकान उघडून आत पाहिले असता, दुकानातील सामान व गल्ला पेटी तील रोख रक्कम दिसून आली नाही. तसेच दुकानातील सिगारेटचे पाकीट व इतर शितपेय चोरी गेल्याचे निर्दशनास आले तेव्हा यावल पोलिसांना माहिती दिली व पंचनामा केल्या नंतर दुकानातुन २० हजार रूपये किंमतीचे सिगारेट पॉकीट व शितपेय आणी २ हजार २०० रूपयांची रोकड असे एकुण २२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे तेव्हा अज्ञात चोरट्या विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार,सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, हवलदार सुनिल तायडे करीत आहे.-

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!