OBC आरक्षणावरून भाजप × कांग्रेस एकमेकांवर आरोप करत एकाच वेळी रास्तारोको आंदोलन
Monday To Monday NewsNetwork।
यावल(प्रतिनिधी)। ओबीसी आरक्षणा संदर्भात शनिवारी यावल येथे भा. ज. पा. त्या वतीने भुसावळ टी पॉइंट वर तर काँग्रेसच्या वतीने बुरुज चौकात १०० फूट अंतरावर एकाच वेळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्य केलें रद्द केलेल्या आरक्षणाचे खापर भाजपने महा विकास आघाडी वर तर काँग्रेसने केंद्रातील भाजप शासनावर फोडले. शंभर फूट अंतरावरील दोन्ही पक्षाच्या वतीने एकमेकांवर करण्यात आलेल्या आरोपांचे नागरिक मात्र बुचकळ्यात पडले. यावल येथे झालेल्या भाजपाचे आंदोलनात डॉ. कुंदन फेगडे ,माजी जि.प. सदस्य हर्षल पाटील, म.सा.का. चेअरमन शरद महाजन, डांभुर्णी सरपंच पुरुजीत चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले तर काँग्रेस आंदोलनात जि. प. सदस्य तथा यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, इटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील यांनी केंद्रावर आरोप केले आहेत. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनात नगरसेवक मनोहर सोनवणे ,हाजी गफ्फारशाह ,अनिल जंजाळे, शेख नईम शेख रशीद,वढोदा सरपंच संदीप सोनवणे, अशपाकशहा, नाना तायडे, इमरान पैलवान ,समाधान पाटील, अविनाश बारी ,पुंडलिक बारी, समीर मोमिन, आदी सहभागी झाले होते. तर भाजपाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी जेडीसीसी संचालक गणेश नेते पी एस सोनवणे डॉक्टर निलेश गडे, रितेश बारी जि प सदस्य सविता भालेराव पंचायत समिती सदस्य दीपक पाटील उपस्थित होते. यावल पोलिसांनी बंदोबस्त राखला.