अल्पवयीन तरुणीचे अपहरण,सहा जणांवर गुन्हा दाखल
Monday To Monday NewsNetwork।
यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील सातपुडा पर्वतातील गाडऱ्या गावात असलेल्या एक अल्पवयीन आदिवासी तरुणी तिच्या नियोजित पतीसह गावी जात असताना तरुणीला सहा जणांनी अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून सहा जणांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ,ता.९ जुलै रोजी अल्पवयीन तरूणी ही वाघझीरा तालुका यावल येथील चुलत बहीणीस भेटायला आलेली असता दि.१२ जुलै रोजी ही तरुणी आपल्या नियोजीत पती रवी हुकाऱ्या बारेला,रा.वाघझीरा तालुका यावल व चुलत भाऊ गणदास खुशाल बारेला याच्या मोटरसायकलवरून बसून गाडऱ्या गावी जात असतांना दुपारी १२ वाजेच्या सुमारास लंगडाआंबा गावापासुन सुमारे एक किलोमिटर अंतरावर दोन मोटरसायकली समोर आडव्या लावल्याच्या दिसुन आल्या त्यामुळे रवी बारेला यांने त्याची मोटरसायकल हळु केली असता जंगलात लपून बसलेले जागीराम गुलाब बारेला, नेमसिंग जागीराम बारेला, अनेरसिंग गुलाब बारेला, नितेश जागीराम बारेला, शांताराम गुलाब बारेला,सर्व राहणार पलासकोट,तालुका-भगवानपुरा,जिल्हा- खरगोन (मध्यप्रदेश)ह. मु. गाडऱ्या तालुका यावल आणी मंसाराम मददास बारेला,राहणार वालपानी, तालुका भगवानपुरा, जिल्हा खरगोन मध्यप्रदेश या सर्वांनी मिळुन तरुणीच्या नियोजीत पती रवी बारेला आणी चुलत भाऊ गणदास बारेला यांना रस्त्यात अडवुन लाथाबुक्याने व काठ्यांनी मारहाण केली. यातील नितेश जागीराम बारेला याने त्या अल्पवयीन तरुणीस तुझ्या चुलत भावाला आणी कुटुंबास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन ढोलगा या गावी व नंतर मोटरसायकलवर बसवुन आपल्या सोबत वालपानी व नंतर सुतपुरी मध्यप्रदेश या गावी घेवुन गेले.
सदर अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ गणदास बारेला हा तरूणीचा शोध घेत भगवानपुरा (मध्यप्रदेश)पोलीस स्टेशन येथे पहोचला त्यांनी दिलेल्या माहीतीच्या आधारवर पोलीसांनी अल्पवयीन तरुणीचा शोध घेऊन त्या तरुणीस पोलीस स्टेशनमध्ये बोलवुन तरूणीने दिलेल्या जबाबात नितेश बारेला यांने पळवुन आणले नसल्याचे सांगीतले. त्या नंतर अल्पवयीन तरुणीने यावल पोलीस स्टेशनला दि.२० जुलै रोजी दिलेला आपला जबाब फिरवल्याने अखेर तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून मध्यप्रदेशातील रहीवाशी सर्व सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अपहरण करणार्यापैकी तरुण संशयित नितेश बारेला या तरूणाचे या तरूणीवर एकतर्फी प्रेम असल्याची चर्चा ऐकायला मिळते.