ब्रेकिंग : पतसंस्थेचा विशेष लेखापरीक्षक ५ लाखाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; सहकारात खळबळ !
यावल-सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | यावल येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अवसायकाला संस्थेचे सावदा येथील राजे छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल कार्यालयाच्या गाळ्याची भरलेली सुरक्षित अनामत रक्कम नगर परिषदेच्या दप्तरी तक्रारदाराच्या नावे पत्र व्यवहार करून वर्ग करून देण्यासाठी ५ लाख रूपयांची लाच स्वीकारतांना आज रंगेहात अटक करण्यात आल्याने परिसरासह सहकारातील लाचखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील श्री महालक्ष्मी नागरीक सहकारी ही पतसंस्था अवसयानात निघाल्याने या संस्थेचे सावदा येथील राजे छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल कार्यालयाच्या गाळ्याची भरलेली सुरक्षित अनामत रक्कम नगर परिषदेच्या दप्तरी तक्रारदाराच्या नावे पत्र व्यवहार करून वर्ग करून देण्यासाठी, सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक सखाराम कडू ठाकरे यांनी तक्रारदाराकडे तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाचलुपत प्रतिबंधक खात्याचे निरिक्षक हेमंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पोनि रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे यांच्या पथकाने पाचोरा येथे जाऊन धुळे येथील सहकारी संस्थेचे विशेष लेखा परीक्षक सखाराम कडू ठाकरे याला पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली असून, याप्रकरणी सखाराम ठाकरे यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत सदरील लेखा परीक्षकाने ज्या ज्या ठिकाणी लेखापरीक्षण केले आहे त्या त्या ठिकाणी पैशांची मोठ्या प्रमाणात मागणी केलेली आहे व सदरील व्यवस्थापनाला प्रशासनाची धमकी दाखवून मोठी रक्कम उकडली आहे परंतु भीतीपोटी कोणीही याच्या विरोधात आतापर्यंत पुढे आलेले नव्हते सदरील लेखापरीक्षकाची आयकर विभागामार्फत चौकशी केल्यास मोठे गभाळ हाती लागू शकते कारण याने सगळ्यांना घाबरवून आतापर्यंत करोडोची मायापुंजी जमा केली असल्याची माहिती मिळत आहे.