युवक तालुका राष्ट्रवादी तर्फे रस्ता दुरुस्ती साठी बांधकाम विभागाला निवेदन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
.
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ब्रहानपूर ~ अंकलेश्वर मार्ग यावल ते चोपडा या दरम्यान खूप खराब झाला असून खूप मोठ्या प्रमाणात मोठे खड्डे निर्माण होऊन वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याची डागडुजी झाली असली तरी ती पाहिजे तशी झालेली नाही तरी तो रस्ता नव्याने करावा व त्याच प्रमाणे विरावली ते दहिगाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती या रस्त्यावर निर्माण झाली आहे तरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व विरावली दहीगाव रस्ता दुरुस्ती किंवा नव्याने तयार करावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून निवेदनाद्वारे केली आहे.
रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया समोर आंदोलनांचा ईशारा दिला आहे.या बाबतचे निवेदन
माहिती साठी नितीन गडकरी, परिवहन व महामार्ग मंत्री भारत सरकार. अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य,श्रीमती रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदार संघ.मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्या कडे पाठवण्यात आली असून या वेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष देवकांत पाटील,राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष नरेंद्र शिंदे,तालुका संघटक राहुल चौधरी , तालुका सरचिटणीस रोहन महाजन , संघटक अक्षय बोरोले, विरावली शाखा अध्यक्ष गिरीष पाटील तालुका समनव्यक किशोर माळी ,उपाध्यक्ष पवन पाटील बादशा पाटील आदींची उपस्थिती होती .