क्राईमयावल

यावल तालुका खुनाने हादरला; तरुणांची निर्घृण पद्धतीने हत्या

यावल, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : तालुक्यातील चितोडा येथील तरुणांची चाकूने गळा चिरून तसेच चाकूचे वार करून निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्या. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या घडली असलीतरी खुनाचा प्रकार मात्र सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

यावल (yawal) तालुक्यातील चितोडा गावातील रहिवासी असलेल्या मनोज भंगाळे या युवकाचा मृतदेह चितोडा-डोंगरकठोरा रस्त्यावरील चंदूशेठ चौधरी यांच्या शेतात असल्याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली. मारेकर्‍यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज संतोष भंगाळे (वय ३९) यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने ओढून रस्त्याला लागून असणार्‍या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे. त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करण्यात आल्याचेही आढळून आले आहे. मात्र हत्येचे कारण अद्यापही समोर आले नसून तालुक्यात आज पहाटेच समोर आलेल्या तरूणाचा अतिशय क्रूर पध्दतीत खून झाल्याचे घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे, पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दुर्घटना स्थळी पंचनामा करत या खुनाचा तपास सुरू केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत मनोज भंगाळे याचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्याचे काम सुरू होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!