क्राईमयावल

यावल येथील सराफा पेढी लूट मधील मोटारसायकल हस्तगत

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल(प्रतिनिधी)। येथील बाजीराव काशिदास कवडी वाले यांचे सराफा पेढीवर सात जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी देशी कट्ट्याचा धाक दाखवू 55 हजार रुपयाचा रोकड सह साडेअकरा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला होता.या प्रकरणाचा तील गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल तालुक्यातील अंजाळे शिवारातील तापी नदीचे खोर्‍यात आढळून आली आहे पोलिसांनी ती मोटरसायकल हस्तगत केली आहे.

येथील कोर्ट रोड वरील बाजीराव काशिदास कवडी वाले यांचे सराफा पेढीवर सात जुलै रोजी अज्ञात चार चोरट्यांनी एका पल्सर गाडीवर येऊन दुकान मालकाला देशी कट्ट्याचा धाक दाखवून 55 हजार रुपये रोकड सहसाडेअकरा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणाचा स्थानिक पोलीस यंत्रणेसह जिल्हा पोलिस यंत्रणा तपास करीत आहे सोमवारी रावेर येथील विशेष गुन्हा शाखेचे हेड कॉस्टेबल महेंद्र सुरवाडे व कुणाल सोनवणे यांना अंजाळे शिवारातील तापी नदी चे खोऱ्यात एक मोटर सायकल पडलेली असल्याची माहिती मिळाल्यावरून येथील पोलिस निरीक्षक सुधीर पाटील हेडकॉन्स्टेबल संजय तायडे असलम शेख सुशील घुगे यांनी संयुक्तपणे जाऊन खोऱ्यातून सोमवारी सायंकाळी मोटरसायकल काढून यावल येथील पोलिस ठाण्यात आणली आहे ही मोटर सायकल तापी नदीचे निर्मनुष्य व दाट झाडी मध्ये फेकून दिलेली होती गुन्ह्यात हीच मोटर सायकल वापरली असल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले लवकरच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडतील असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!