यावल न्यायालयाने सुनावली ट्रॅक्टर अपघात मृत्यु प्रकरणी चालकास सहा महिन्याची शिक्षा व दंड
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। तालुक्यातील साकळी येथे भरधाव ट्रॅक्टरच्या अपघातात झालेल्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टर चालक प्रकाश भिमसिंग बारेला याला अपघाताला कारणीभुत ठरवुन त्यावर यावल न्यायालयाने निकाल देत आरोपीस सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर माहिती अशी की, साकळी येथील डांभुर्णी रस्त्यावर भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवुन १७ एप्रिल २०१७ रोजी अपघात झाला होता या अपघातात सुकलाल लालसिंग बारेला हा ट्रॅक्टरखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान याप्रकरणी चालक प्रकाश भिमसिंग बारेला याची विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता याप्रकरणी यावल न्यायालयाचे न्या .एम .एस . बनचरे यांनी निकाल देत ट्रॅक्टर चालक प्रकाश भिमसिंग बारेला यास सहा महिन्याची शिक्षा व तीन हजार रुपये दंड सूनावला असून , सरकारी पक्षाकडुन ऍड. नितीन खरे यांनी काम पाहीले , या अपघातात मृत्यू झालेल्या मयताच्या वारसास पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.