यावल तालुक्यातील सावखेडा सिम चे ग्रामविकास अधिकारी निलंबित तर किंनगावच्या ग्रा.वि. अधिकाऱ्यांना कारणे नोटीस
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील किनगावचे ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत सपकाळे याना कारणे दाखवा नोटीस तर सावखेडा सिम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना बेशिस्त वागणुकीमुळे निलंबीत करण्यात आल्याने
यावल पंचायत समितीच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मकरंद सैदाणे यांना वारंवार सुचना करून देखील बैठकीस उपस्थित न राहणे दफ्तर तपासणी व बेशिस्त आणी शासकीय कामात दिरंगाई करणे अशा अनेक वागणुकीबद्दल सैदाणे यांना निलंबीत करण्यात आले असून किनगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत सपकाळे यांना देखील याच कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहीती यावल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी दिल्याने केलेल्या कार्यवाहीमुळे पंचायत समितीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली असुन गटविकास अधिकारी यांनी केलेल्या या कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत आहे.
याप्रकारे तालुक्यात झालेल्या रोजगार हमी योजनेचे भ्रष्ठाचार संदर्भात १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीत झालेले निकृष्ठ कामांचे गोंधळ व गोठ्यांच्या बोगस लाभार्थी प्रकरणी देखील अशाच प्रकारची निष्पक्ष कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातून करण्यात येत असून या बाबत मंडे टू मंडे ने वृत्त प्रसिद्ध केले होते,