सोन्याचांदीच्या दागिन्यांसह पाच लाखाच्या पावत्याची चोरी
किनागाव ता,यावल(प्रतिनिधी)। येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कलुप तोडुन सोन्याचांदीच्या दागीन्यासह पाच लाखाच्या ठेवीच्या पावत्या चोरी केल्याने यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
किनगाव येथील सेवानिवृत्त वायरमन डिंगबर पाटील हे ५ ऑक्टोबर रोजी पुणे येथे मुलगा देवानंद पाटील आणी नितिन पाटील यांच्या भेटीसाठी सहकुटुंब गेले असता कोरोना संसर्गामुळे त्यांना पुण्याहुन लवकर येणे शक्य झाले नाही १० ऑक्टोबर रोजी रात्री त्यांचे शेजारी पद्दमाकर ढाके यांनी त्यांना फोन करून तुमच्या घरात चोरी झाली असल्याची माहीती दिली त्यामुळे डिगंबर पाटील यांनी माहीती मिळताच तात्काळ ते गावी आले,त्यांनी यावल पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घरातील कपाटातीत लॉकरमधील प्रत्येकी पाच ग्रॅम सोन्याच्या चार अंगठया , ३७ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत सोबत पदक , १२ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची लहान मुलाची चैन, २५ हजार रुपये किमत असलेली मनी पोत, ४ लाख रुपयांच्या स्टेट बँकेतील मुदत ठेवीच्या पावत्या व जेडीसीसी बॅकेच्या १ लाख ६ हजार रुपये किमतीच्या मुदत ठेवीच्या पावत्या आणी ६ हजार रुपये रोख चोरांनी चोरून नेल्याचे सांगितले, याबाबत यावल पोलिसस्टेशनला घरफोडी चा गुन्हा दाखल करण्यात येऊन जळगावहुन श्वानपथकला पाचारण करण्यात आले घरफोडीच्या स्थळापासुन १०० मिटरपर्यंतच्या किनगाव चौफुलीच्या अंतरापर्यंत येवुन श्वान घुटमळला, याबाबत पोलिस निरीक्षक अरुण धनवडे हे तपास करत असून या परिसरात सिसिटीव्ही कॅमेरे नसल्याने या घरफोडीचा तपास लावण्याचे पोलिसांन समोर आव्हान आहे.