भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

लग्नासाठी ठार मारण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग : गुन्हा दाखल !

यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील नायगाव येथील २२ वर्षीय तरुणीसोबत ओळखीचा गैरफायदा घेत लग्नासाठी ठार मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरसोली येथील एका तरुणाविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

नायगाव येथील रहिवासी तरुणी ही जळगाव येथे शिक्षणासाठी नातेवाइकांकडे सन २०१८ पासून होती. तेथे तिची ओळख शिरसोली (ता.जळगाव) येथील शांताराम श्रावण ठाकूर या तरुणासोबत झाली. शांताराम हा जुलै २०१८ पासून ते २७ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सदरील तरुणीशी जवळीक साधत होता. तरुणी जळगाव येथे क्लासेसला जात येत असताना तिच्यासोबत ओळख करत नंतर नायगाव येथील घरी देखील ये-जा केली. नुकतेच २७ नोव्हेंबरला तरुणीच्या घरी जाऊन माझ्याशी लग्न कर, अशी मागणी केली.

लग्न न केल्यास तरुणी व तिच्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. यावेळी घाबरलेल्या तरुणीने कुटुंबीयांची चर्चा केली व शनिवारी यावल पोलिसांत शांताराम ठाकूर याच्याविरुद्ध विनयभंग, ठार मारण्याची धमकी देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार विजय पाचपोळे हे करत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!