आदिवासी अल्पवयीन बालीकेचा वनरक्षकाकडून विनयभंग,तब्बल आठ तासानंतर गुन्हा दाखल
Monday To Monday NewsNetwork।
यावल(प्रतिनिधी)। सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासींची वस्ती असलेल्या लगडा आंबा पाड्यावरील १३ वर्षीय बालिकेचा येथील वन्य जीव संरक्षण विभागातील एका वनरक्षकाने मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास विनयभंग केला. आदिवासी बालकांचे आई…वडील बाहेर गावी गेले असल्याची संधी साधत पाणी पिण्याचे निमीत्ताने घरात शिरुन वनरक्षकाने हे कृत्य केले आहे.
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासींची वस्ती असलेल्या लगडा आंबा पाड्यावरील आदिवासी दाम्पत्य आपल्या तीन बालकांना घरी सोडून बाहेरगावी गेले असता येथील वन्य जीव संरक्षण विभागातील वनरक्षक रमेश बबुता थोरात यांनी घरात शिरुन पिण्यासाठी पाणी मागीतले असता सहा वर्षीय बालिकेने पिण्यास पाणी दिले ते पाणी न पिता त्या बालीकेस 20 रुपये देवून हापसीवरुन ताजे पाणी आणण्यास सांगितले तर अन्य दुसऱ्या बालकास पैसे देवून बिस्किटे आणण्यास सांगितले व वनरक्षकाने घरात एकट्या असलेल्या 13 वर्षीय बालीकेशी अंगलट करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची तक्रार पिडीत बालिकेच्या आईने दिल्यावरून येथील पोलिस ठाण्यात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार विनोद खांडबहाले व सहकारी पुढील तपास करीत आहे
तब्बल आठ तासां नंतर गुन्हा दाखल
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या अतीदुर्गम लंगडा आंबा या आदिवासी पाड्यावर पीडित कुटुंब बुधवारी दुपारी साडेतीन वाजता येथील पोलिस ठाण्यात पोहोचले मात्र गुन्हा रात्री मध्यरात्री दाखल करण्यात आला आहे तब्बल आठ तास लागले.