दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दोन वर्षाची सक्त मजूरी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दोषी ठरवत चौहाणसिंग उर्फ चवन्या उर्फ सोन्या बिलारसिंग पावरा ( रा. जामुनझिरा) याला आज यावल न्यायालयाने दोन वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा ठोठावली.
यावल तालुक्यातील किनगाव येथील दिलीप वसंत पाटील यांची एमएच १४ बीएस ६५८१ क्रमांकाची दुचाकी खालकोट शिवारातून जुलै २०२१ मध्ये चोरीस गेली होती. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी चौहाणसिंग उर्फ चवन्या उर्फ सोन्या बिलारसिंग पावरा याला अटक करण्यात आली होती. हवालदार सुनील तायडे यांनी संशयित आरोपी विरोधात यावल न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. आरोपीविरुद्ध चार साक्षिदार सरकार पक्षातर्फे भक्कम बाजू मांडत तपासण्यात आले. आरोपीला दोषी ठरविण्यात आले. न्या एम. एस. बनचरे यांनी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपी अटक केल्यापासून त्यास जामीन मंजूर न झाल्यामुळे कारागृहातच होता. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नितीन खरे यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. अलीम शेख यांनी त्यांना मदत केली आरोपीतर्फे एड सोनवणे यांनी काम पाहिले.