संजय गांधी योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी यावल मध्ये बनावट सह्या व शिक्क्यांचा वापर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। तालुक्यातील नायगाव येथील लाभार्थ्यांनी संजय गांधी योजने अंतर्गत श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट सह्या व शिक्का मारून पैसे घेण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी बाबत की, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी यावल तालुक्यातील नायगाव येथील ३२ लाभार्थ्यांची प्रकरणे तहसील कार्यालयामध्ये दप्तरी सादर करण्यात आले. ही प्रकरणे तपासणी व पडताळणीसाठी नायगावच्या तलाठ्यांकडे पाठविले असता सदर प्रकरणांवरील सह्या व शिक्के बनावट असल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकाराची गंभीर दखल घेत तहसीलदार महेश पवार यांनी संबंधितांना नोटिसा बजावल्या असून सदर प्रकरणे कोणत्या ई-सेवा केंद्रामार्फत तयार करण्यात आली, बनावट शिक्के व सह्या कोणी केल्या या सह , तालुक्यातील अन्य कोणत्या गावातील अशी बनावट प्रकरणे सादर करण्यात आली आहे का ? या बाबतही चौकशी होणे महत्वाचे असून अशी अनेक बोगस प्रकरणे असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .