भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

पशूधनाचे मोफत लसीकरण करा,यावल राष्ट्रवादी युवक काँगेसची मागणी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्यात लाळ्या खूजगट , लम्पि स्क्रीन डिसीज या संसर्जन्य आजारांच्या प्रादुर्भावा पासून पशुधनाचे संरक्षण व्हावे म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत पशुचे मोफत लसीकरण करणे बाबत यावल राष्ट्रवादी युवक काँगेस तर्फे गट विकास अधिकारी पं स,यावल याना निवेदन देण्यात आले ,यावल तालुक्यातील ग्रामीण भागात शेती सह पशूपालन हा प्रमुख व्यवसाय केला जातो. बदलत्या हवामानामुळे गाय,म्हशी, बैल, शेळी, मेंढि या सारख्या जनावरांमध्ये तोंडखुरी, पायखुरी,लाळ्या खूजगट , लम्पि स्किन डिसीज या सारखे साथीचे संसर्गजन्य आजार जनावरांमध्ये पहावयास मिळत असून या आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या साथीच्या रोगामुळे शेतकरी व पशुपालकामध्ये चिंता जनक व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


आपल्या विभागातील कर्मचाऱ्याची व पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या कमी असल्याने याचे योग्य नियोजन करून संपूर्ण यावल तालुक्यातील पशुसंवर्धन संरक्षण उपाय योजना कराव्यात, आधीच यावल तालुक्यातील शेतकरी,पशुपालक करोना, नापिकी, दुष्काळी , शेती मालास भाव नसल्याने आधीच अडचणीत आहे म्हणून पशुधन वाचवणे खूप आवश्यक आहे म्हणून पशु धानाचे संवर्धन करून लवकरात लवकर लसीकरण मोहीम तालुक्यातील प्रत्येक गावो गावी आयोजन करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल च्या वतीने करण्यात आली आहे,
निवेदनाची प्रत,जि प आरोग्य सभापती,जिल्ह्य पशुसंवर्धन अधिकारी जळगांव,कार्यकारी मुख्याधिकारी जि.प जळगांव,जिल्ह्याधिकारी, जळगांव ,यांना पाठवण्यात आली असून या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऍड देवकांत पाटील, शहर अध्यक्ष हितेश गजरे,समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, जिल्ह्या युवक सरचिटणीस विनोद पाटील, तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, शाखा अध्यक्ष गिरीष पाटील आदींची उपस्थिती होती

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!