भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

कर्नाटक राज्यातील सहा लाख रुपयांची लूट प्रकरणाचे यावल कनेक्शन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कर्नाटक राज्यातील लूट प्रकरणचे यावल कनेक्शन समोर आले असुन गुरुवारी कर्नाटक पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने येथील शासकिय कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या मुलास ताब्यात घेतले. त्यांच्या घरात आश्रयास असलेला एक संशयित फरार झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी एक शासकिय कर्मचारी तरुणीस कर्नाटक पोलिसात हजर राहण्याची समज देण्यात आली असुन यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, बिदर जिल्ह्यातील शांतापूर पोलीस स्टेशन हद्दीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये लुटले होते. त्यातील दोन संशयित यावल येथे असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना होती. त्यानुसार गुरुवारी पहाटे कर्नाटक पोलीस पथक यावलला आले आणि पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, कॉ. सुशील घुगे, राजेश वाढे, भूषण चव्हाण, राहुल चौधरी, अशोक बाविस्कर यांनी त्या आरोपींशी संबंधित वाघझिरा आश्रमशाळेतील कर्मचारी तरुणीचा शोध घेतला. यावल बसस्थानकावर आदित्य सत्यवान पवार या तरुणासोबत असल्याचे तिने सांगितले. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आणखी एक संशयित शिवकुमार हा पवार यांच्या घरी आश्रयास होता. पण पोलिसांचे वाहने पाहून शिवकुमार तेथून फरार झाला.

शासकीय कर्मचारी तरुणी अडचणीत आदित्य पवार हा येथील प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पवार हे मूळचे सोलापूरचे आहे. आदित्य याने वाघझिरा आश्रमशाळेतील कर्मचारी तरुणीच्या फोन पेवर ५० हजारांची रक्कम देखील टाकली आहे. त्यामुळे ही तरुणी अडचणीत आली आहे. या तरुणीस कर्नाटक पोलिसात हजर राहण्याची समज देण्यात आली असुन यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!