भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

यावल पोलीस स्टेशन हद्दीत अर्थपूर्ण संबंधातून अवैद्यधंद्यांना ऊत, दारूचा महापूर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल शहर व तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासुन सट्टा, जुगार, अवैध दारू विक्री सर्व प्रकारच्या अवैद्यधंद्यांना उत आल्याचे दिसत असुन आदीच सर्वसामान्य नागरिक कोरोनाच्या महामारीत आर्थीक संकटात सापडलेले असतांना शहरात आणी ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर अवैद्यधंदे खुलेआम सुरू असल्याने अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांना हप्तेखोरीचा आशीर्वाद असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे.

दरम्यान यावल शहरासह तालुक्यात सर्वत्र सट्टा मटक्यासह अवैध दारू विक्री सुरू असल्याने अनेक मजुरांनी आपल्या कामाकडे पाठ फिरवत आहे, तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैद्यरित्या सार्वजनिक ठीकाणी बेकायदेशीर देशी दार, हातभट्टीची घातक गावटी दारूची विक्री होत असल्याने अल्पवयीन मुलही या दारू व्यसनाच्या आहारी जातांना दिसत आहे अशा प्रकारे यावल पोलीस स्टेशनच्या हदीत अवैध्द धंद्दे जोमाने सुरू आहे यामुळे अवैध्द धंदे व्यवसायीक मुजोर झालेले असून या बाबत अधिक चौकशी साठी व्यावसायिकाला विचारले असता आम्ही सर्व अवैध व्यावसायिक सर्वांना हप्ते देत असल्याचे एका अवैध व्यावसायिकाने सांगितले. जुगाराचे अड्डे जोमात सुरू असून ,गल्ली बोळात सट्टा-बेटिंग सुरु आहे,विविध ठीकाणी जुगारीचे अड्डे सुरू असल्याने भुरटया चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.

सार्वजनिक ठीकाणी खुलेआम गुटका विक्री होत असुन अशा प्रकारच्या अवैद्यधंद्यांना सर्वत्र ऊधाण आले असून, मागील दोन वर्षा च्या कालावधीत कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीत लॉक डाऊनच्या संकटकाळात सर्व प्रकारचे उद्योग व्यवसाय बंद झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली असता आर्थिक संकटातुन नागरिक बाहेर निघण्याच्या प्रयत्नात असतांनाच तालुक्यात शहर,परिसर व ग्रामीण क्षेत्रात अवैद्यधंद्यांनी धुमाकुळ माजवला असुन , या सहज मिळणाऱ्या दारू , सट्टा मटका या अवैद्य धंद्यायांच्या माध्यमातुन पैशांच्या प्रलोभनाला बळी पडुन अनेकांचे संसाराची राख रांगोळी होवुन त्यांचे संसार उद्धवस्थ होवुन त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे प्रसंग ओढवु लागला आहे.पोलीस अधिक्षक या कडे लक्ष देतील का? तात्काळ अवैद्यधंद्यांना तात्काळ प्रतिबंध करून बंद करण्याची मागणी सर्वसामान्य नागरीकांकडून करण्यात येत आहे . ( पुढील बातम्यांमध्ये सट्टा-मटका,जुगार,अवैध देशी-गावठी दारू,गुटका,आदी बाबत ठिकाणांसह सविस्तर वाचा.)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!