भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

“तु आमचे रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडायला लावतो” पोलिस पाटलाला वाळू तस्करा कडून मारहाण

Monday To Monday NewsNetwork।

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील सावखेडा सीम येथील पोलीस पाटलासह त्यांच्या कुटुंबाला ”तू आमचे वाळूचे ट्रॅक्टर तहसीलदारांना सांगून पकडायला का लावतो ?” या कारणावरून
वाळू तस्करांनी मारहाण करून धमकावल्याची घटना घडली.

या बाबत पोलिसां कडुन मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील पोलीस पाटील पंकज बडगुजर पोलीस पाटील वय ३५ वर्षे,सावखेडा सिम,हे आपल्या घरात कुटुंबासोबत जेवण करीत असतांना गावातील दिलीप सुभाष पाटील,प्रकाश सुभाष पाटील, विकास पंडीत पाटील , विजय विकास पाटील , चेतन विकास पाटील यांनी त्यांच्या घरात अनधिकृत प्रवेश करत त्यांना मारहाण केली.”तु आमचे रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदारांना का पकडयाला लावतो ” तु पोलीस पाटील कसा राहतो असे बोलुन,शिवीगाळ करीत पोलीस पाटील यांना खाटेच्या दांडाने मारहाण केली.तसेच पंकज बडगुजर यांच्या भाऊची पत्नी पुनम जीवन बडगुजर व भाऊ जिवन दयाराम बडगुजर आणि राहुल जिवन बडगुजर यांना ही लाकडी दांडयाने मारहाण करून दुखापत केली. याबाबत पोलीस पाटील पंकज जिवन बडगुजर यांनी यावल पोलीसात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!