यावल येथे तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या !
यावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथील देशमुख वाड्यातील रहिवासी असलेला भुसावळ येथील महाविद्यालयात शिकत असलेल्या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय किसन कोंडे (वय 20) हा शहरातील देशमुख वाड्यातील लहान मारोती परिसरातील रहिवासी असून भुसावळ येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. आज रविवार, दि.५ डिसेंबर रोजी घरात वरच्या मजल्यावर एकटा असतांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील किसन कोंडे बाहेरून घरी आल्यावर त्यांना धनंजय हा घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. धनंजय यास तातडीने उपचारासाठी भुसावळ येथे नेत असताना वाटेतच त्याचे निधन झाले आहे.
या तरुणांने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात राजेंद्र माधव कुंभारकर यांनी खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.