प्रेमभंग झाल्याने यावल तालुक्यात तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्यातील किनगाव येथील तरूणाने प्रेमभंग झाल्याच्या कारणास्तव राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी राजू महाजन हे
बुधवार २२ डिसेंबर रोजी सकाळी पत्नी व लहान मुलगा योगेश व सुन असे शेतात कामासाठी निघून गेले. त्यांचा मोठा अविवाहित मुलगा समाधान राजू महाजन वय-२७ हा एकटाच घरी असतांना समाधान याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.राजू महाजन व त्याचे कुटुंब संध्याकाळी शेतातून घरी आल्यावर मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आईवडील व कुटुंबाने आक्रोश करत हंबरडा फोडला,मयत समाधान याने आत्महत्ते पूर्वी ” माझा प्रेमभंग झाला आहे ” अशी सुसाईट नोट भिंतीवर लिहीली असल्याचे आढळून आले.मयताच्या मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात येऊन याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे