तुम्ही बियर पिताय, जरा थांबा ! तुम्हाला माहितीयं, गटाराच्या पाण्यापासून तयार केली जातेयं बियर
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आपण बियर पिता, मग तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे.तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पिताय ती बियर गटार च्या पाण्यापासून तर तयार होत नाही ना? कारण एक कंपनी गटारीच्या पण्यापासून बियर तयार करते.
भरपूर दारू प्रेमी बीअर आवडीने पितात. पण तुम्ही जी बीअर पित आहात ती कशी बनवली आहे, कशी बनविली जाते, याचा कधी विचार केला आहे का? ही एक जर्मन ब्रुअरी कंपनी आहे, जी बिअर बनवण्यासाठी ड्रेन वॉटर वापरत आहे. या कंपनीचं नाव रीयुज ब्रू आहे जी वेसेनबर्ग शहरात आहे. पाणी वाचवण्यासाठी असं केलं जात असल्याचं कंपनीने सांगितलं..
जर्मन न्यूज वेबसाईट DW मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या कंपनीच्या मालकाचं म्हणणं आहे की, ही बिअर जरी नाल्यातील पाण्यापासून बनवली जात असली तरी ती पूर्णपणे सुरक्षित आहे.कंपनीचं म्हणणं आहे की त्यांनी आधी हे पाणी पूर्णपणे स्वच्छ केलं. नंतर त्याचा वापर बिअर बनवण्यासाठी केला.
कंपनीचा दावा आहे की ही बिअर बनवण्यासाठी ती चार टप्प्यांत वापरत असलेले नाल्यातील पाणी स्वच्छ करते. या टप्प्यांमध्ये यांत्रिक, जैविक आणि रासायनिक अवस्था देखील असतात. शेवटच्या टप्प्यात, पाण्याचे ओझोनेशन केलं जातं आणि नंतर ते फिल्टर केलं जातं. चार टप्प्यांत पाणी पूर्णपणे स्वच्छ होते आणि बिअर बनवण्यासाठी योग्य होते.