यावल तालुक्यातील तरुणाचा पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील दोघे मित्र पंढरपूर मध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले असताना चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी उतरले असता त्यातील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी समोर आली आहे.
बुडालेल्या तरुणाचा सुमारे आठ तासानंतर मृतदेह मिळून आला आहे. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. ही तरुण यावल तालुक्यातील न्हावी गावचा रहिवासी दर्पण निलेश कोलते, वय १८ वर्ष. असं बुडालेल्या तरूणाचे नाव असून या घटनेने यावल तालुक्यातील न्हावी गावावर शोककळा पसरली आहे.

दर्पण निलेश कोलते व त्याचा मित्र मनोज रघुनाथ कापडे (वय १८,रा. न्हावी ता. यावल. हे दोघे मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले होते. पंढरपूरमध्ये दर्पण कोलते आणि त्याचा मित्र मनोज कपडे सकाळी चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी गेले होते. येथील भक्त पुंडलिक मंदिरजवळ ते नदीत स्नानासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दर्पण व त्याचा मित्र दोघे बुडाले. दोघेजण बुडत असल्याचे नदीत आंघोळीसाठी आलेल्या भाविकांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी लागलीच मदत करत मनोज कापडे याला बाहेर काढले .मनोज ला वाचविण्यात त्यांना यश आले. मात्र दर्पण कोलते पाण्यात बुडाला.
याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस प्रशासन व बचाव पथक येथे दाखल ही झाले आहे. त्यांच्याकडून बुडलेल्या तरूणाचा शोध सुरू करण्यात आला आहे. दर्पण निलेश कोलते याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह तब्बल आठ तासांनी हाती लागला. या घटनेने यावल तालुक्यातील न्हावी गावा सह परिसरात तरुणाच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे.